सूर्योदय योजनेतंर्गत मिळणार स्वस्तात वीज…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत देशातील घरांच्या छतावर सोलार पॅनेल बसवण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत एक कोटीहून अधिक घरांच्या छतावर सोलर सिस्टीम बसवण्यात येणार आहेत.
या योजनेचा उद्देश घराघरात स्वस्तात वीज पोहोचवणे हा आहे. या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच देशात अद्यापही असे भाग आहेत जिथे घरांमध्ये वीज पोहोचलेली नाही.
केंद्र सरकार आता पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत अंधार असणाऱ्या घरात आशेचा किरण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत कोट्यवधी घरे उजळणार आहेत.