केंद्र शासनाच्या ‘या’ सिंचन प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे जाणार पाणी…
आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी जाणार आहे. जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी केंद्र एका महत्वकांक्षी सिंचन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे देशातील हा पहिला प्रयोग असणार आहे.
हा आहे प्रकल्प :- ▪️ केंद्र सरकारच्या जलाशक्ती मंत्रालयाने महाराष्ट्रातील नीरा देवघर प्रकल्पासाठी 3592 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशाकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बंद पाईपलाईनद्वारे 14 टीएमसी पाणी दिले जाणार आहे.
▪️ आजवर कालव्याने पाणी देताना मोठ्याप्रमाणात पाण्याचा अपव्यव होत असे. त्यामुळे या योजनेतून सूक्ष्म सिंचन व बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचनाचे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणले जाणार आहे.
एकंदरीत, हा प्रकल्प मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याच्या अटीवर केंद्रीय जलाशक्ती मंत्रालयाने मान्यता दिली असल्याने लगेचच या कामांना सुरुवात होणार आहे.