Take a fresh look at your lifestyle.

गॅस सिलिंडरमुळे दुर्घटना झाल्यास ‘ही’ भरपाई देणार; केंद्र शासनाचा निर्णय

0

एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. एलपीजी सिलिंडरमुळे दुर्घटना झाल्यास होणाऱ्या नुकसानीची तेल विपणन कंपन्या भरपाई देणार असल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी माहिती दिली.

तेल विपणन कंपन्यांसोबत रजिस्टर्ड असणाऱ्या सर्व LPG ग्राहकांना विमा कव्हर दिले जाणार आहे. यामध्ये आगीमुळे मृत्यू झाल्यास प्रति व्यक्तीस 6 लाख रुपयांचे अपघात कव्हर दिले जाईल. त्यात प्रति व्यक्तीला कमाल दोन लाख रुपयांसह घटनेसाठी 30 लाख रुपयांपर्यंत तेल विपणन कंपन्या देणार आहे.

LPG विमा कव्हर मिळवण्यासाठी 

▪️LPGमुळे दुर्घटना झाल्यास सर्वप्रथम तेल विपणन कंपनीना कळवा.

▪️वितरकाकडून तेल विपणन कंपनीच्या कार्यालयाला माहिती देण्यात येईल.

▪️तेल विपणन कंपनीचे कार्यालय विमा कंपनीला माहिती देईल.

▪️त्यानंतर संबंधित विमा कंपनी विमा पॉलिसींच्या तरतुदीनुसार निर्णय घेईल.