दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी १० डिसेंबरला शिष्यवृत्ती परीक्षा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) १० डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी २३ ऑगस्टपर्यंत. नियमित शुल्काद्वारे ऑनलाइन अर्ज भरता येणार असून, या परीक्षेतील शिष्यवृत्तीपा विद्यार्थ्यांना नववी ते बारावीसाठी दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
आर्थिक दुर्बल घटकातील शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक साडेतीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे, ते विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत. तसेच सातवीमध्ये किमान ५५ टक्के गुण असणे, अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०२४ मध्ये जाहीर केला जाईल.
अधिक माहिती आणि अर्ज करण्यात साठी खालील वेबसाईट ला भेट द्या
https:// www. mscepune. in https://nmmsmsce.in