आशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती- नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन..!
आशा ची नियुक्ती
आदिवासी क्षेत्र
१. आदिवासी क्षेत्रात प्रत्येक १००० लोकसंख्येमागे १ आशा
२. आदिवासी क्षेत्रात कार्य करणा-या आशा चे किमान ८
वी पर्यंत शिक्षण झालेले असावे.
३. आदिवासी क्षेत्रात काम करणा-या आशा २०-४५
वयोगटातील असाव्यात.
४. आदिवासी क्षेत्रात काम करणारी आशा ही स्थानिक
विवाहीत असावी.
५. उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य देण्यात येते.
बिगर- आदिवासी क्षेत्र
१. बिगर आदिवासी क्षेत्रात प्रत्येक १५०० लोकसंख्ये मागे १ आशा असते.
२. बिगर आदिवासी क्षेत्रात कार्य करणा-या आशा चे
किमान १० वी पर्यंत शिक्षण झालेले असावे. उच्च महिलांना प्राधान्य देण्यात येते.
नियुक्ती प्रक्रिया
१. आशाची निवड ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभा बोलावून
करण्यात येते. ग्रामसभेने निवडलेल्या आशाची नियुक्ती तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येते.
२. आदिवासी क्षेत्रात ग्रामसभा किंवा ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडून ५ आशांची
निवड करण्यात येते. त्यापैकी तालुका आरोग्य अधिकारी
यांचेकडून एका आशा स्वयंसेविकेची निवड करण्यात येते
व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने निवडलेल्या आशा स्वयंसेविकेस नियुक्ती पत्र देण्यात येते.
३. बिगर आदिवासी क्षेत्रात ग्राम आरोग्य, पोषण,
पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक,
वैद्यकिय अधिकारी यांची समिती आशा स्वयंसेविका
पदाकरिता प्राप्त अर्जाची छाननी करुन ग्रामसभेत ३ अर्ज सादर करेल व ग्रामसभा ३ अर्जापैकी एका अर्जदार
महिलेची निवड आशा स्वयंसेविका म्हणून करेल.
४. आशा स्वयंसेविकेस Induction मॉडयुल व
H.B.N.C चे प्रशिक्षण दिले जाते.
५. आशा स्वयंसेविकेस वेळोवेळी मासिक सभा आयोजित करुन तिला प्रशिक्षण दिले जाते.
६. प्रशिक्षणाचे वेळी तिला प्रवासभत्ता व दैनिक भत्ता रु. १००/- देण्यात येतो.
७. आशा प्रशिक्षणापुर्वी प्रत्येक जिल्हयांने निश्चित
केलेल्या संख्येनुसार प्रशिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर
दिले जाते. तद्नंतरच आशा स्वयंसेविकेच्या प्रशिक्षणास
प्रारंभ केला जातो.
कामावर आधारित मानधन
१. आशा ला दिले जाणारे कामावर आधारित मोबदला
तिच्या कार्यकुशलतेवर अवलंबून असतो.
२. आशा च्या कार्याची नोंद एका नोंदवहीत घेतली जात
असुन तिच्या कार्यकुशलतेनुसार (दर्जानुसार) तिला
प्रोत्साहनपर वेतन/भत्ते दिले जातात.
३. आशा ला मिळणारे कामावर आधारित मोबदला हे
महिन्यातून एकदा होणा-या बैठकीच्यावेळी PHC स्तरावर दिले जातात.
४. आशा ला दिले जाणारे कामावर आधारित मोबदला हे
धनादेशाच्या स्वरुपात