Take a fresh look at your lifestyle.

हमिदवाडा येथे ५०० शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन

0

हमिदवाडा (ता. कागल) येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, मुरगूड संचालित अ दर्जा प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था सदाशिवनगर येथे बुधवारी (ता. १८) सकाळी दहा वाजता शिकाऊ उमेदवारीकरिता भरती मेळावा आहे.

टाटा मोटर्स लि. पुणे कंपनीत शिकाऊ उमेदवारांची फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, शीटमेटल, मशीनिस्ट, आॅटो मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, ग्रायंडर, ॲण्ड डायमेकर इ. तेरा व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवारांची ५०० पदे भरली जाणार आहेत.

निवड होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना कॅन्टीन, बस सुविधा, विद्यावेतन, रजा इत्यादीची तरतूद मोफत आहे. वयोमर्यादा १८ ते २४ असावी. विद्यावेतन किमान १० हजार मिळेल. मुलाखतीकरिता सीनिअर असोसिएट नीलेश बकरे उपस्थित राहतील.

शिकाऊ उमेदवारीसाठी इच्छुकांनी अर्ज, बायोडाटा, आयटीआय डाक्युमेंट, ई-आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटोसह मुलाखतीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हमिदवाडा येथे बुधवारी (ता. १८) सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य अमोल वास्कर यांनी केले आहे.