नवोदय विद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू, लवकर करा अर्ज..!
जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्षासाठी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविले जाते आहेत. वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थी घर बसल्या ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज सादर करू शकणार आहेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून विद्यार्थ्यांना 31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
नवोदय विद्यालय सेलू काटे येथे 2023-24 या शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता सहावी प्रवेशाकरिता ऑनलाईन निवड परीक्षा घेतली जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना निवड परीक्षेसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत..प्रवेश निवड परीक्षेस इच्छुक असणारा विद्यार्थी शासनमान्य शाळेमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शिकत असावा.
विद्यार्थी व त्याचे पालक वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असावेत. विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2011 पूर्वी व 30 एप्रिल 2013 नंतर झालेला नसावा. ही अट सर्वांसाठी तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी लागू असणार आहे.
असा करा अर्ज:- जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रियेतून सोपी करण्यात आली आहे. प्रवेश चाचणी परीक्षा 2023 साठी डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल, टॅबद्वारे नवोदय विद्यालय समिती या ovin/nvs/en/Home1 किंवा https://cbseitms.nic.in/ या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे:- अर्ज सादर करताना आधार कार्ड, मुख्याध्यापकाचे पत्र (स्टडी सर्टिफिकेट), फोटो, सही आवश्यक आहे. निवड परीक्षा 29 एप्रिल रोजी होणार असल्याचे जवाहर नवोदय विद्यालयाचे डॉ. मनोज वानखडे नवोदय परीक्षा प्रभारी यांनी सांगितले.