महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना….
राज्यात योजनेचा पहिला टप्पा दिनांक २ जुलै २०१२ पासून गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, उपनगरीय मुंबई, मुंबई शहर या आठ जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने दिनांक २१.११.२०१३ पासून ही योजना राज्यव्यापी केलेली आहे. दिनांक ०२ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने ही योजना सुरु झाली व दिनांक १३ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दिनांक २३.०९.२०१८ पासून आयुषमान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबरोबर एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. दिनांक ०१.०४.२०२० पासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना राज्यामध्ये ई निविदा पद्धतीने निवड करण्यात आलेल्या युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनीतर्फे राबविण्यात येत आहे.
लाभार्थी पात्रता- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना: श्रेणी अ: अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळ्या, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न )शिधापत्रिका धारक कुटुंबे श्रेणी ब: औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे
तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.
श्रेणी कः शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले, शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.
मदतीसाठी संपर्क:
टोल फ्री क्रमांक – १५५३८८ / १८००२३३२२००
पत्ता – पो. बॉक्स क्रमांक १६५६५, वरळी पोस्ट ऑफीस, वरळी, मुंबई ४०००१८
संकेतस्थळ- www.jeevandayee.gov.in