Take a fresh look at your lifestyle.

…आता सर्व शासकीय कार्यालयातील व्यवहाराची ‘वर्णमाला’ बदलली; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग,

शासननिर्णय क्रमांक – कपासू- २०२० / प्र.क्र०५६ / भाषा-२

शासन निर्णय:- सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मंडळे, महामंडळे,प्राधिकरणे, मराठी पाठ्यपुस्तके इत्यादींमध्ये तसेच ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होतो अथवा भविष्यात केला जाणार आहे अशा सर्व ठिकाणी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणक इत्यादींसाठी सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शवण्यात आलेल्या देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमालेचा, अक्षरमालेचा व अंकांचा शासनाने स्वीकार केला आहे.

त्या अनुषंगाने वर्णमालेच्या संदर्भातील स्पष्टीकरणे तसेच विशिष्ट अक्षरांच्या लेखनाबाबतच्या सूचना, स्वरचिन्हे, जोडाक्षरे, वर्णक्रम, लेखनात वापरावयाची विरामचिन्हे व अन्य चिन्हे, अंक, अंकांचे अक्षरी लेखन इत्यादींविषयी सविस्तर व सोदाहरण सूचना देणारी सात परिशिष्टे सोबत जोडली आहेत. मराठी भाषेच्या लेखनात एकरूपता राखण्यासाठी सर्वांनी ह्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.ह्या संदर्भातील ह्यापूर्वी काढण्यात आलेले सर्व शासननिर्णय अधिक्रमित करण्यात येत आहेत.

हा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक-संकेतांक २०२२१११०१५३००२९२३३ आहे.