ग्रामीण भागातील नागरिकांचे काम झाले सोपे; ग्रामपंचायतीचे दाखले दिसणार मोबाईल वर
सध्या महाराष्ट्र शासन ऑनलाइन पद्धतीचा वापर करून जनतेचा त्रास कमी कसा करता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देत आहे. आता शासनाने एक नवीन अॅप नुकतेच महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट लॉन्च केलेले आहे.
या अॅपद्वारे आपण घरबसल्या ग्रामपंचायतीचे सर्व दाखले मोबाईलद्वारे पाहू शकतोच याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये असलेली कार्यकारिणी किंवा अधिकारी वर्ग यांची संपूर्ण माहितीसुद्धा या अॅपवर सहजरित्या बघता व त्यात माहिती भरता येणार आहेत.
महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट मोबाइल अॅप हे नागरिक सेवा मिळविण्यासाठी एक खास उपाय आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना जन्म, मृत्यू, विवाह, नमुना 8 (मूल्यांकन), बीपीएल असे प्रमाणपत्र मिळू शकते. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI आणि QR स्कॅनिंगचा वापर करून नागरिक आपला मालमत्ता कर ऑनलाइन भरू शकतात, त्याद्वारे पावती देखील मिळवू शकतात.
हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन तिथे “Maha E Gram Citizen Connect” सर्च करायचे आहे. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला सहजरित्या हे ॲप मिळून जाईल
किंवा खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/ma
haegramCitizenConnect