Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम(सिलॅबस) 2022

0

पहिल्यांदाच होणार शारीरिक चाचणी:-  शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे.

यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत.
तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.

शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील.
लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल.

तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.

लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पोलिस भरतीसाठी आता पहिल्यांदा मैदानी चाचणीच घेतली जाणार असल्याचे २३ जून रोजी स्पष्ट करण्यात आले आहे. ५० गुणांची शारीरिक चाचणी तर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील तरूणांना सुरवातीला लेखी परीक्षा घेतल्याने भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागत होते. त्यामुळे शारीरिक चाचणीत अव्वल ठरणाऱ्या उमेदवारांनाही पोलिस भरतीची संधी मिळत नव्हती. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.

लेखी चाचणीत बहुतेक प्रश्न हे बहुपर्यायी प्रकारचे असतील. लेखी परीक्षेत उमेदवाराला किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात १० जागा रिक्त असतील तर त्यासाठी एका पदासाठी दहा जणांना (शारीरिक योग्यता चाचणीत किमान ५० टक्के गुण अपेक्षित) लेखी चाचणीसाठी बसता येईल. पण, दहा जागांसाठी १०० जण लेखी परीक्षेस पात्र झाले आणि शंभराव्या क्रमांकावरील उमेदवाराला जेवढे गुण आहेत, तेवढे गुण असलेल्या उर्वरित उमेदवारांनाही लेखी परीक्षा देता येणार आहे. आता २०२० मधील सात हजार २३१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्याची घोषणा केली होती.

राज्याच्या गृह विभागात सद्यस्थितीत तब्बल ४९ हजार पदे रिक्त आहेत. आता परीक्षेची कार्यपध्दती निश्चित झाल्याने रिक्त पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे. महिलांना ८०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशी शारीरिक चाचणी असेल. पहिल्यांदा लेखीऐवजी आता मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लेखी चाचणी (१०० गुण)
(अ) शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.

(ब) लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील
( १ ) अंकगणित
(२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
(३) बुध्दीमत्ता चाचणी
(४) मराठी व्याकरण.

(क) लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे इतका असेल.

(ड) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

लेखी परीक्षेचे स्वरूप
– शारीरिक चाचणीत ५० टक्के गुण
– रिक्त जागांच्या एकापदासाठी १० जणांची होईल निवड
– अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न
– लेखी परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ