Take a fresh look at your lifestyle.

जननी सुरक्षा योजनेतंर्गत महिलांना मिळणार ‘आर्थिक’ लाभ…

0

केंद्र सरकार गर्भवती महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी अनेक योजना राबवत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जननी सुरक्षा योजना सुरक्षित मातृत्व कार्यक्रम म्हणून चालवली जात आहे.

या योजनेंतर्गत गरीब आणि दुर्बल आर्थिक वर्गातील महिलांना सरकार 3400 रुपयांची आर्थिक मदत देते. गरीब गर्भवती महिलांमध्ये सुरक्षित प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकार गरोदर महिलांना आर्थिक मदत करते. दारिद्र्यरेषेखालील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांची प्रसूती शासकीय रुग्णालयात किंवा मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयात होणे आवश्यक आहे. सरकारने दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. त्यामुळे गरोदर महिलांचे बँक खाते असणे बंधनकारक असून बँक खातेही आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही दारिद्र्यरेषेखालील ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला 1,400 रुपयांची आर्थिक मदत मिळेल. यासह, आशा सहयोगींसाठी आणि अतिरिक्त सेवेसाठी 300 रुपये दिले जातात. एकूणच ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते.

दुसरीकडे, शहरी भागात राहणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी एकूण 1,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. यासोबतच अशा सहकार्‍याला 200 रुपये फी आणि अतिरिक्त मदतीसाठी 200 रुपये दिले जातात.
अर्ज करण्यासाठी या nhm.gov.in अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.