नागरिकांनो, ‘ही’ माहिती अपडेट न केल्यास ‘रेशन कार्ड वर धान्य मिळणार नाही…
राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून गरिबांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. सरकार गरिबांना कमी खर्चात उपचारासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतात, शासनाकडून गरिबांना रेशन कमी खर्चात किंवा मोफत ही दिले जात आहे. यामध्ये शिधापत्रिकेचाही समावेश आहे. शिधापत्रिकेच्या मदतीने गरीब लोकांना कुटुंबातील सदस्यांनुसार कमी किमतीत किंवा मोफत रेशन मिळू शकते. मात्र, शिधापत्रिकेतील एक गोष्ट तात्काळ Update करणेही आवश्यक आहे. अन्यथा रेशनकार्डधारकांना धान्य घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
दरम्यान, रेशनकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे अतिशय आवश्यक आहे. रेशनकार्डमध्ये चुकीचा क्रमांक अपडेट केल्यास किंवा जुना क्रमांक अपडेट केल्यास तुम्हाला राशन मिळणार नाही व तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत रेशनकार्ड संबंधित अपडेटही उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे रेशनकार्डमधील मोबाईल क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.
प्रत्येक राज्यासाठी सरकारने स्वतंत्र शिधापत्रिका जारी केली जाते. अशा स्थितीत रेशनकार्डमध्ये मोबाईल क्रमांक राज्यवार पद्धतीने अपडेट करता येत आहे. त्याची प्रक्रिया आता ऑनलाइन देखील शक्य आहे. जर तुमचे रेशन कार्ड दिल्लीशी या राज्याशी जोडलेले असेल, तर काही पायऱ्यांसह रेशनकार्डमधील मोबाईल क्रमांक ऑनलाइन पद्धतीने सुद्धा अपडेट करता येणार आहे.
https://nfs.delhigovt.nic.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या लिंकवर जा.
येथे आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, शिधापत्रिकेत लिहिलेले कुटुंबप्रमुखाचे नाव आणि नवीन मोबाईल क्रमांक टाका.कॅप्चा कोड टाका आणि सेव्ह करा. लगेच तुमचा नवीन नंबर अपडेट केला जाईल.