ITR भरणाऱ्यांसाठी खुशखबर; ITR भरण्याची मुदत वाढली, आता ‘या’ तारखेपर्यंत भरा IT रिटर्न…!
करदात्यांना आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक असते. ते भरण्यासाठी सरकारकडून एक विशिष्ट मुदत दिली जाते, ज्यामध्ये करदात्यांना कोणत्याही परिस्थितीत आपला कर भरावयाचा असतो . वित्त मंत्रालयाने बुधवारी वर्ष २०२२-२३ साठी कंपन्यांकडून इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. दरम्यान ज्या कंपन्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी यापूर्वी प्राप्तिकर भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर होती.
देशभरातील कंपन्यांनी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी त्यांचे आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. ज्या कंपन्यांची हस्तांतरण किंमत प्रक्रिया अंतर्गत आहे त्यांच्यासाठी प्राप्तिकर दाखल करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२२ असेल.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने एका अधिसूचनेत म्हटले की आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख एक महिना वाढवण्यात आली आहे कारण त्यांनी ऑडिट अहवाल दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली होती. सीबीडीटीने मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी प्राप्तिकर रिटर्न सादर करण्याची देय तारीख ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत वाढवली आहे ज्यामुळे काही विशिष्ट श्रेणी करनिर्धारकांसाठी ऑडिटचे विविध अहवाल दाखल करण्यासाठी देय तारखेत मुदतवाढ दिली जाते.
आयटीआर दाखल केल्याच्या 10 दिवसांनंतर, भारतातील करदाते त्यांच्या ITR परतवायची स्तिथी तपासू शकतात. तर, ज्या करदात्यांनी १० दिवसांपूर्वी त्यांचा ITR भरला आहे आणि अजूनही त्यांच्या परताव्याची वाट पाहत आहेत ते आयकर ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या ITR परताव्याची स्थिती ऑनलाइन तपासू शकतात.