Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2022-23 चे नवीन वेळापत्रक जाहीर

0

सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १४ मार्च, २०१८ च्या शासन निर्णयास अनुसरुन ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन परिक्षा प्रक्रिया राबविण्याबाबतच्या सुचना दिनांक २३ जुलै, २०१८ चा शासन निर्णय व दिनांक १३ फेब्रुवारी, २०१९ च्या शासन शुध्दीपत्रकान्वये देण्यात आल्या होत्या.

वित्त विभागाचा दिनांक १६/०५/२०१८ चा शासन निर्णय व दिनांक २८/१२/२०१८ च्या शासन शुध्दीपत्रकास अनुसरुन सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील एकूण १३,५१४ इतकी रिक्त पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी जिल्हा परिषदांमार्फत माहे मार्च, २०१९ मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही पदे शासनाच्या महाआयटी मार्फत परीक्षा घेऊन भरण्यात येणार होती. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता तसेच, त्यानंतर महापोर्टल रद्द झाल्याने सदरची परीक्षा होऊ शकली नाही.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी संबंधित गट-क

संवर्गातील भरतीची प्रक्रियेबाबत शासनाचा नवीन
निर्णय २०२२-२०२३
मार्च, २०१९ महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या
अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क
पदभरतीबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, २०२१ (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील १८ संवर्गाची सर्व जाहिरात, परीक्षा व संपूर्ण भरती प्रक्रिया याद्वारे रद्द करण्यात येत आहे. सदर पदभरती रद्द झाल्यामुळे या जाहिरातीनुसार सर्व उमेदवारांनी अर्जापोटी ‘भरलेले परीक्षा शुल्क त्यांना संबंधित जिल्हा परिषदांमार्फत परत करण्यात येईल.

उमेदवारांना परीक्षा शुल्काच्या परत करावयाच्या कार्यपद्धतीबाबत जिल्हा परिषदांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत भरण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक) निश्चित करण्यात येवून प्रपत्र- १ मध्ये जोडण्यात आले आहे.

सदर कालबद्ध कार्यक्रमाचे सर्व जिल्हा परिषदांनी तंतोतंत पालन करावे. त्याकरिता रिक्त पदे, त्यांची आरक्षण निश्चिती, नव्याने उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेणे (ऑनलाइन / ऑफलाइन) इ. तदनुषंगिक परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहील.

जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित वर नमूद
५ संवर्गाची पदे वगळता इतर संवर्गातील पदभरतीची
कार्यवाही वित्त विभागाच्या दि. ३० सप्टेंबर २०२२ च्या
शासन निर्णयातील निर्देशानुसार जिल्हा परिषद / पंचायत
समितीसाठी सुधारित आकृतिबंधास शासनाची मंजूरी
मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत करण्यात यावी.

माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी
यापूर्वी अर्ज केलेले/भरलेले आहेत, व सध्या वयाधिक्य
झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा
उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून पुढील फक्त एका परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादित सूट देण्यात येत आहे. तसेच, मार्च, २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे सदर पदासाठी असलेली शैक्षणिक अर्हता ही पुढील फक्त एका परीक्षेसाठी कायम राहील.