18 लाखांहून अधिक विद्यार्थी थेट या योजनेचे लाभार्थी; जाणून घ्या पीएम श्री शाळा योजनेबाबत…
केंद्र सरकार/राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार / स्थानिक
स्वराज्य संस्थांद्वारे व्यवस्थापित केलेल्या निवडक विद्यमान शाळांना बळकट करून देशभरातील 14,500 हून अधिक शाळांचा विकास पीएम श्री शाळा म्हणून करण्याची ही एक नवीन योजना आहे. पीएम श्री शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे सर्व घटक असतील.
या आदर्श शाळा म्हणून काम करतील आणि त्यांच्या आसपासच्या इतर शाळांना मार्गदर्शन देखील करतील. पीएम श्री शाळा विद्यार्थ्यांच्या संज्ञानात्मक विकासासाठी दर्जेदार शिक्षण देतील आणि 21 व्या शतकातील महत्त्वाच्या कौशल्यांनी सुसज्ज सर्वांगीण आणि सर्वगुणसंपन्न व्यक्ती तयार करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यांची जोपासना करण्याचा प्रयत्न करतील.
महत्वाची वैशिष्टे
विविध पार्श्वभूमी, बहुभाषिक गरजा आणि मुलांच्या
विविध शैक्षणिक क्षमतांची काळजी घेणाऱ्या न्याय्य,
सर्वसमावेशक आणि आनंदी शालेय वातावरणात उच्च
दर्जाचे शिक्षण पीएम श्री शाळा प्रदान करतील आणि
राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनइपी) 2020 च्या तरतुदींनुसार
त्यांना त्यांच्या स्वत:च्या शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय
सहभागी बनवतील.
●पीएम श्री शाळा त्यांच्या संबंधित विभागातील इतर
शाळांना मार्गदर्शन प्रदान करून नेतृत्व प्रदान करतील.
●पीएम श्री शाळांना हरित शाळा म्हणून विकसित केले
जाईल.
●प्रत्येक इयत्तेत प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या
शिकण्यातून काय निष्पन्न झाले यावर भर दिला जाईल.
वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील
परिस्थितींमध्ये ज्ञानाच्या वापरावर आणि योग्यतेवर सर्व
स्तरांवरील मूल्यमापन आधारित असेल.
●शाळा गुणवत्ता मूल्यांकन रचना(SQAF) विकसित
केली जात आहे. परिणाम मोजण्यासाठी ही रचना प्रमुख
कार्यप्रदर्शन निर्देशक आहे. इच्छित मानकांची खात्री
करण्यासाठी नियमित अंतराने या शाळांचे गुणवत्ता
मूल्यमापन केले जाईल.