‘या’ जिल्ह्यात ‘पोलीस भरती प्रक्रिया’ राबविली जाणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
राज्यात नव्याने पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यात ८ हजार पोलिसांची भरती होणार आहे. परंतु शासनाच्या नियमानुसार जिल्हा पोलीस दल आस्थापनेवर रिक्त पदांची संख्या दिसत नसल्याने जिल्ह्यात भरतीची प्रक्रिया राबविली जाणार नाही, अशी शक्यता आहे.

गेल्या वर्षी स्थानिक पातळीवर ४० पदांसाठी पोलीस भरती राबविण्यात आली होती. यात अनेक तरुणांनी आपला सहभाग नोंदवून प्रक्रियेत सहभागी झाले होते. असे असले तरी तरुणांची भरती प्रक्रियेतील तयारी सुरूच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरती राबविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यात ८ हजार नवीन भरती होणार असून, यात जिल्ह्यासाठी रिक्त पदांचा समावेश नसल्याचे सांगण्यात येत आहे.