Take a fresh look at your lifestyle.

प्रधान महालेखापाल कार्यालयाचे निवृत्तीधारकांसाठी ‘पेन्शन तुमच्या दारी’ सह विविध उपक्रम

0

प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या द्वारे पश्चिम व दक्षिण
महाराष्ट्रात (पुणे, नाशिक आणि कोकण विभाग कार्यक्षेत्रात) नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात करण्याता
आली. या उपक्रमांचा उद्देश, ज्येष्ठ नागरिक निवृत्ती वेतनधारकांना वास्तविक वेळेत (रिअल टाइम)
व्यावहारिक सहकार्य देण्यासाठी सध्या, दररोजच्या
तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यांचा उपयोग करुन प्रधान
महालेखापाल कार्यालयाच्या हितसंबंधितांच्या सहभागाला आणि सार्वजनिक सेवा वितरणाच्या प्रसाराला बळकटी देणे हा आहे.

प्रधान महालेखापाल (A & E)- 1 कार्यालयामार्फत राज्य निवृत्ती वेतनधारक, जीपीएफ सदस्य आणि राज्य सरकारच्या विभागातील आहरण आणि संवितरण अधिकारी यांच्यासाठी तंत्रज्ञानाशी मानवी सांगड घालून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत.

अ) एजी ऑफिसच्या संकेतस्थळावर उपलब्ध पेन्शन
संवाद’ टॅबवरील “नोंदणी लिंकद्वारे
https://cag.gov.in/ae/mumbai/en नोंदणी
करु शकतात.

ब) व्हॉइस-मेल सेवा, ज्याद्वारे पेन्शनधारक/ जीपीएफ
सदस्य, व्हॉइस मेल नंबर- 020-711777775 वर कॉल
केल्यानंतर त्यांची विनंती रेकॉर्ड करून पेन्शन संवादासाठी 24/7 नोंदणी करू शकतात.

क) टोल-फ्री सेवा फोन नंबर 1800-22-0014 ज्याद्वारे
प्रधान महालेखापाल कार्यालयाशी विनामूल्य संपर्क
साधला जाऊ शकतो.