मुला-मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी ‘या’ आहेत खास योजना…
देशातील कित्येक नागरिकांना त्यांच्या मुला-मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल, तर तुम्हाला अनेक सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करावे लागेल. जाणून घ्या अत्यंत महत्वाची माहीती आणि गुंतवणुकीसाठीच्या योजना…
1) सुकन्या समृद्धी योजना:- मुलींच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी ही एक सरकारी योजना आहे, जी तुम्हाला दरवर्षी उपलब्ध असलेल्या इतर काही योजनांपेक्षा अधिक म्हणजेच 7.6% व्याजदराने परतावा देते. 10 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलीसाठी तुम्ही त्यात पैसे गुंतवू शकता. त्याची पॉलिसी मुदत त्याच्या लग्नापर्यंत 18 किंवा 21 वर्षे आहे (जे आधी असेल). तुम्ही यामध्ये वार्षिक किमान 250 ते कमाल 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता.
2) एलआयसी कन्यादान पॉलिसी:- एलआयसी कन्यादान पॉलिसी ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी परवडणाऱ्या प्रीमियममध्ये एक मोठा आर्थिक निधी तयार करू शकेल. मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला दरवर्षी 50,000 रुपये मिळत राहणार आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या सोईनुसार 13 वर्षे ते 25 वर्षांपर्यंतचा मॅच्युरिटी पीरियड निवडू शकता. पॉलिसीधारकाचा अकाली मृत्यू झाला तर प्रीमियम माफ केला जाईल आणि 10 लाख रुपये त्वरित जमा केले जातील. तसेच जी काही विमा रक्कम असेल त्या विम्याच्या रकमेच्या 10% रक्कम परिपक्व होईपर्यंत प्रत्येक वर्षी दिली जाते.
3) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी:- तुम्ही तुमच्या मुलासाठी 15 वर्षांच्या कालावधीसाठी पीपीएफ (PPF) मध्ये गुंतवणूक करू शकता आणि दीर्घ मुदतीत चांगला रिटर्न मिळवू शकता. एका वर्षात कमीत कमी 500 रुपये तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. माहीतीनुसार, असेही म्हटले जाते की, आयकर कायद्याच्या कलम 80C अन्वये 1.5 लाख रुपयापर्यंतचा करसुद्धा तुम्ही वाचवू शकता. दरवर्षी तुम्हाला त्यावर 7.1 % व्याजदराप्रमाणे रिटर्न मिळू शकतो. बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला हे खाते उघडता येणार आहे. याविषयी तिथे सविस्तर माहिती घ्या.
(वरील योजनांच्या सविस्तर माहीतीसाठी संबंधित कार्यालय, बँक, पोस्ट ऑफिसमध्ये भेट देऊन नियम व अटींबाबत सविस्तर माहिती घ्या.)