Take a fresh look at your lifestyle.

तरुणांनो… अग्निवीर वायू भरती(IAF) प्रक्रियेसाठी तारखा घोषित

0

भारतीय हवाई दलानं नवीन अग्निवीर वायू भरती प्रक्रियेसाठी तारखा घोषित केल्या आहेत. नवीन भरती प्रक्रियेसाठीची नोंदणी प्रक्रिया नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल.

या भरतीसाठी जानेवारी 2023 मध्ये परीक्षेचं आयोजन केलं जाईल, अशी माहिती हवाई दलानं ट्विटद्वारे दिली आहे. हवाई दलानं 12 ऑक्टोबरला यासंबंधीची आधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून दिली. त्यात म्हटलं आहे की, या भरती प्रक्रियेसंदर्भात लवकरच संपूर्ण नोटिफिकेशन agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केलं जाईल.

तथापि, हवाई दलाकडून अग्निवीर वायू 2022 ची भरती करण्यात आली आहे. आता 2023 साठी नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठीची नोंदणी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होईल.