वीजग्राहकांनो शासनाच्या ‘अभय योजनेचा’ लाभ घ्यावा; जाणून घ्या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे
विलासराव देशमुख अभय योजनेचा कालावधी १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत असून ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे. ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेत ग्राहकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरली तर त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. या योजनेत सुलभ हप्त्याने रक्कम भरावयाची सुविधा आहे. मात्र त्यासाठी मुद्दलाच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरणे अत्यावश्यक आहे. ग्राहकांना उर्वरित रक्कम सहा हप्त्यात भरता येईल.
विलासराव देशमुख अभय योजनेची वैशिष्ट्ये:- थकित मुद्दल एकरकमी भरणाऱ्यांना अधिकची सवलत, सुलभ हप्त्यात थकबाकी भरण्याची सोय, फेरजोडणीचा लाभ
योजनेचे फायदे:- कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकित रकमेत सवलत देणारी ही योजना आहे.
राज्यात कायमस्वरुपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांची संख्या ही 32 लाख 16 हजार 500 आहे. तर एकूण थकबाकी ही 9 हजार 354 कोटी आहे. तर थकबाकीची मुळ रक्कम ही 6 हजार 261 आहे.