डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती
उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय
तसेच अशासकीय अनुदानित, अंशत: अनुदानित, कायम
विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये व अकृषि विद्यापीठे व
त्या विद्यापीठाअंतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील (खाजगी
अभिमत विद्यापीठे तसेच स्वयं अर्थसहाय्यीत खाजगी
विद्यापीठे वगळून) व्यावसायिक व बिगर व्यावसायिक
अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. योजना बिगर आरक्षित प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्यांना लागू आहे.
आवश्यक कागदपत्रे:-
१. सक्षम प्राधिकरणाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र सादर
करणे आवश्यक आहे.
२. पालकांचे अल्पभूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर
असलेबाबतचे प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक वर्षाच्या
लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षांचे संबंधित तहसिलदार अथवा
सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमापणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
३. CAP संबंधित कागदपत्रे. (केवळ विधी, शिक्षणशास्त्र
व शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम)
४. गॅप संबंधित दस्तऐवज (गॅप असल्यास)
५. दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र.
लाभाचे स्वरूपः-
1) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी:-
अ) ज्या विद्यार्थ्याचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा
नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुणे
महानगर क्षेत्रातील सर्व शहरे तसेच औरंगाबाद व नागपूर
या शहरात वसतिगृह आहे. या महानगरातील
अभ्यासक्रमासाठी निर्वाह भत्याची रक्कम ३० हजार रूपये तर इतर शहरे व ग्रामीण भागासाठी २० हजार रूपये.
ब) इतर विद्यार्थ्यांसाठी १ लाखापर्यंत कुटुंबाचे वार्षिक
उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी मुंबई, पुणे महानगर
क्षेत्रातील सर्व शहरे तसेच औरंगाबाद व नागपूर या शहरात वसतिगृह आहे. या महागनरातील अभ्यासक्रमासाठी निर्वाह भत्याची रक्कम १० हजार रूपये तर इतर शहरे व ग्रामीण भागासाठी ८ हजार रूपये आहे. तर १ ते ८ लाख रूपये कुटुंबाचे उत्पन असलेल्या लाभार्थ्यांसाठीही महानगरासाठी १० हजार तर इतर शहरे व ग्रामीण भागासाठी ८ हजार रूपये आहे.
2) बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी:-
अ) बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १ लाखापर्यंत
उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांला २ हजार रूपये निर्वाह भत्ता देण्याची तरतूद आहे.
ऑनलाईन अर्ज, नवीन मंजूरीसाठी तसेच नूतनीकरणासाठी https://mahadbtmahait.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
संपर्क- शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य –
जिल्हा माहिती कार्यालय.