Take a fresh look at your lifestyle.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

राज्यात शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, विजेचा
शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्ती, सर्पदंश, विचूदंशमुळे
होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात
तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात,
यामुळे बऱ्याच शेतकऱ्याचा मृत्यू ओढवतो किंवा काहीना
अपंगत्व येते.

घरातील कर्त्या व्यक्तीस तसेच त्याच्या
कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे
उत्पनाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण
होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबास
आर्थिक लाभ देण्याकरता राज्यातील सर्व वहितीधारक
खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य ( आई – वडील, शेतकऱ्याची पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती ) असे १० ते ७५ वयोगटातील एकूण २ जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने मार्फत आर्थिक साहाय्य देण्यात येते.

योजनेचे स्वरुपः-
शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात विमा योजनेंतर्गत
शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास
गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमार्फत
शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबास आर्थिक साहाय्य देण्यात
येते.

योजनेच्या अटी:-
1) रस्त्यावरील व रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू,
जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा
धक्का अपघात, विज पडून मृत्यू, खुन, उंचावरून पडून
झालेला अपघात वा मृत्यू, सर्पदंश, विंचू दंश, जनावरांच्या चावण्यामुळे, रेबीज होवून मृत्यू, जखमी होवून अपंगत्व, जनावरांच्या हल्ल्यात मृत्य, दंगल व अन्य कोणतेही अपघात यामध्ये समाविष्ट आहेत.
2) अपघात झाल्यानंतर ४५ दिवसाच्या आत दावा नोंदवणे आवश्यक आहे.
3) १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार विमा
पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला
शेतकरी व त्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार
नसलेला शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक अशा
एकूण दोन जणांना लाभ घेता येईल.

योजनेअंतर्गत लाभ:-
4) अपघाती मृत्यू, अपघातामुळे २ डोळे, अथवा २ अवयव निकामी होणे व अपघातामुळे दोन अवयव निकामी उदा. १ डोळा व १ निकामी होणे यासाठी २ लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळेल.
5) अपघातामुळे १ डोळा अथवा १ अवयव निकामी होणे
यासाठी १ लाख आर्थिक सहाय्य मिळेल.

संपर्क: अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.