Take a fresh look at your lifestyle.

जळगांव ST महामंडळातील प्रलंबित नियुक्त्या लवकरच….

0

राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने सन २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु कोरोना महामारीमुळे या प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. आता चालक व वाहकांना लवकरच नियुक्त्या मिळणार आहेत, अशी माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.

ही भरती युती शासनाच्या काळात करण्यात आली होती. परंतु ३ ते ४ वर्षे उलटून गेली तरीही उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही. सद्यस्थितीमध्ये रा. प. महामंडळात कंत्राटी पद्धतीने चालक भरती करून या उमेदवारांना डावलण्यात आले. कंत्राटी पद्धतीची भरती रद्द करून २०१९ मधील दुष्काळग्रस्त व इतर भरतीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

यावर शिंदे यांनी दखल घेत संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता या रखडलेल्या नियुक्त्या लवकरच होणार असल्याची चिन्हे आहेत.