कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती
कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील
उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे. जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा
क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत
कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व
मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता
निर्माण करणे हा उद्देश कृषी यांत्रिकीकरण योजनेचा आहे. कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि
यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे हे महाडीबीटी, कृषी
विभागाचे मुख्य धोरण आहे.
अनुदानः- या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र /
अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल.
1. ट्रॅक्टर
2. पॉवर टिलर
3. ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
4. बैल चलित यंत्र/अवजारे
5. मनुष्य चलित यंत्र/अवजारे
6. प्रक्रिया संच
7. काढणी पश्यात तंत्रज्ञान
8. फलोत्पादन यंत्र/अवजारे
9. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
10. स्वयं चलित यंत्रे
पात्रता:-
1. शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
2. शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.
3. शेतकरी अनु. जाती, अनु. जमाती मधील असल्यास
जातीचा दाखला आवश्यक.
4. फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील
म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार.
5. कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास,
ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र
असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे
आवश्यक.
6. एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला
असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १०
वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी
अर्ज करता येईल.
महाडीबीटी पोर्टलवर कृषि यंत्र / अवजारे यांच्या
खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण)
योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज
योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला
मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक
आहे. https://mahadbtmahait.gov.in/या
संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा
पर्याय निवडावा. शेतकरी मोबाईल, संगणक / लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.