25 वर्षापर्यंत लाईट बिलाचा खर्च येणार नाही; बघा 1KW सोलर बसविण्याचा खर्च व अनुदान रक्कम
प्रत्येक महिन्याला येणारे वीजबिल हे सगळ्यांसाठी मोठी डोकेदुखी असते. जर लाईटचा खर्च वाचला तर बचत देखील होते आणि यामुळे मोठा दिलासा मिळतो. वाढत्या
वीज दरासोबत वीजबिलाचा खर्चही वाढत आहे. पेट्रोल डिझेलसह वीज दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
वीजबिल भरूनही अनेकदा विजेचा तुटवडा सहन करावा लागत आहे. यासाठी ग्रीन एनर्जी व सोलर पॅनल हा वीज संकटासाठी चांगला पर्याय आहे. एका सौर पॅनलची लाईफ 25 वर्ष असते. तुम्ही जर सोलर बसवले तर दीर्घकाळ विजबिलापासून सुटका मिळून जाईल.
1 KW सोलर पावर:- तुम्ही 1 KW सोलर लावत असाल, तर सर्वसाधारणपणे 600 ते 700 वॅट एवढी
पॉवर मिळू शकते. तसेच तुम्हाला 1 KW पॉवर पाहिजेत असेल, तर 2500 VA चे इन्व्हर्टर व 335 W चे कमीत कमी 5 सोलर पॅनल लावावे लागतील.
1 KW सोलर बॅकअप:- 1 KW सोलर बॅकअपचा वेळ तुम्ही टाकलेल्या एकूण लोडवर अवलंबून असतो व साधारपणे 1 किलोवॅट सोलर पॅनल दररोज 4 ते 5 तास
युनिट वीज देते. तुमच्याकडे 4 युनिट वीज आहे आणि 500 वॅटचे लोड चालवत असाल, तर तुमचे लोड 8 तास टिकेल. जर तुम्ही दुसरीकडे 1000 वॅटचे लोड चालवत असाल, तर 4 तासांचा बॅकअप मिळेल.