Take a fresh look at your lifestyle.

‘या’ योजनेत शेतकऱ्यांना मिळतो 2 लाखांचा विमा…

0

शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तिमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते.

घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते अशा वेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अशा शेतकऱ्यांना नंतर त्यांच्या कुटुंबांना लाभ दायक ठरणार आहे.

अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस / त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना” ही योजना सन २००५-०६ पासून कार्यान्वित केली आहे. सन २००९ १० पासून सदर योजनेचे नामाभिधान शेतकरी जनता अपघात विमा योजना” असे करण्यात आले. सदर विमा योजना रु.१.०० लाख इतक्या विमा संरक्षणासह राबविण्यात येत आहे.

“शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे” नामाभिधान आता “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, ” असे करण्यात येत आहे. ही विमा योजना चालू सन २०१५ सुरू करण्यात आली आहे रु.२.०० लाख विमा संरक्षणासह राबविण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे.