Take a fresh look at your lifestyle.

पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर ‘पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्राची’ सुविधा…

0

परराष्ट्र मंत्रालयाने पारपत्राशी संबंधित सेवा सुलभ
करण्यासाठी आणखी एक निर्णय जाहीर केला आहे. 28
सप्टेंबर 2022 पासून देशभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट
ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर (पीओपीएसके) पोलीस
क्लिअरन्स सर्टिफिकेट्स (पीसीसी) साठी अर्ज करण्याची
सुविधा मिळणार आहे. यामुळे पीसीसी अपॉइंटमेंट साठीची तारीख लवकर मिळेल.

या निर्णयामुळे परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीय नागरिकांना सुविधा होईल तसेच शिक्षण, दीर्घकालीन व्हिसा आणि इमिग्रेशन यासाठी लागणाऱ्या पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट साठीही मदत होईल. गोवा पारपत्र कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय प्रेस नोट
“Ministry of External Affairs announces
another measure for facilitation of
passport related services. The facility to
apply for Police Clearance Certificates
(PCC) to be included at all online Post
Office Passport Seva Kendras (POPSK)
across the country beginning from
September 28, 2022. This would help
significantly for the availability of PCC
appointment slots and that too at an
earlier date.
This facility would help Indian citizens
seeking employment abroad and other
Police Clearance Certificate requirements
in the Field of Education, Long Term Visa
and Emigration.”