वन्य प्राण्यामुळे मनुष्यहानी किंवा पशुधन हानी झाल्यास मिळणार 20 लाख रुपये
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यांनी किंवा पशुधन मृत्यू किंवा अपंग किंवा जखमी झाल्यास. अर्थसहाय्य देण्याबाबतचा जीआर दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
यामध्ये वाघ, बिबट्या अस्वल, गवार, रानडुक्कर, लांडगा तर तडस, कोल्हा, मगर, रान कुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास दिनांक 02/07/2010 आणि त्यानंतर
30/03/2013, 29/05/2013. 16/01/2015. आणि 11/11/2016. आणि 28/11/2018 च्या शासन निर्णय मधील तरतुदीनुसार अर्थसहाची रक्कम ही संबंधितांना अदा करण्यात येते.
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तडस, कोल्हा, मगर, हत्ती, रान कुत्रे यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य आणि तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास त्यांना खालील अर्थसहाय्य देण्यात येते. व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा कायम अपंग झाल्यास किंवा जखमी झाल्यास अर्थसहाय्य शासनाकडून दिले जाते.
किती मिळते नुकसान भरपाई:- व्यक्तीचा मृत्यू झाल्यास रुपये वीस लाख रुपये. पैकी दहा लाख रुपये देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशद्वारे व उर्वरित रक्कम दहा लाख रुपये. ही संयुक्त राष्ट्रीयकृत बँक खात्यात व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम म्हणजेच फिक्स डिपॉझिट जमा केली जाते. व्यक्ती मृत्यू झाल्यास या ठिकाणी बाब आहे. अपंग झाल्यास या ठिकाणी पाच लाख रुपयापर्यंत आर्थिक लाभ देण्यात येतो. व्यक्ती गंभीर इतर जखमी झाल्यास एक लाख 25 हजार रुपये एवढा लाभ देणे येतो. आणि व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास या ठिकाणी 20000 रुपये प्रति व्यक्ती लाभ देण्यात येतो.