सरकारी नोकरीत किंवा कामात महत्वाचे ठरणारे ‘पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र’ कसे मिळवायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती
हल्ली कुठल्याही नोकरीसाठी (मग ती सरकारी असो कि खाजगी) अर्ज करतांना किंवा नोकरीवर रुजू होतांना आपल्याला एक अत्यंत महत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. ते प्रमाणपत्र म्हणजे ‘चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र’ (Police Clearance Certificate Online) होय.
उमेदवारांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर मग तो अर्ज संबंधित पोलीस स्टेशनला ऑनलाईन स्वरूपात जातो. पोलीस स्टेशन स्तरावर उमेदवाराची चारित्र्य पडताळणी केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने उमेदवारावर दिवाणी किंवा फौजदारी गुन्हे दाखल आहेत का? किंवा उमेदवारावर न्यायालयात काही खटले प्रलंबित आहेत का? याची पडताळणी केली जाते. पोलीस स्टेशन स्तरावरील पडताळणीअंती तो अर्ज संबंधित पोलीस आयुक्तालय कार्यालय / पोलीस अधीक्षक कार्यालयात पडताळणीसाठी दाखल होतो.
पोलीस आयुक्तालय कार्यालय/पोलीस अधीक्षक कार्यालयातील पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सदरचे ‘चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र’ उमेदवारास मिळते. नुकतीच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निवीर’ सैन्य भरतीमध्ये मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना सर्वप्रथम पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यामुळे चारित्र्य प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कॉम्पुटर सेंटरवर युवकांनी खूप गर्दी केली आहे. परंतु त्यांच्याकडून सर्व उमेदवारांचे चारित्र्य पडताळणीसाठीचे अर्ज ऑनलाईन करणे शक्य होत नाही. त्यामुळे युवकांनी स्वतः संगणक किंवा मोबाईलवर चारित्र्य पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करावा.
खालील सहा सोप्या पायऱ्यांचा अवलंब करून तुम्ही पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करू शकता.
1. नोंदणी 2. लॉगीन 3. अर्ज भरा 4. शुल्क भरणा 5. स्थानिक पोलीस स्टेशन स्तरावरील पडताळणी 6. पोलीस आयुक्तालय / पोलीस अधीक्षक कार्यालय स्तरावरील पडताळणी नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम महाऑनलाईनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती अपलोड करणे.
अधिकृत संकेतस्थळ https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx