Take a fresh look at your lifestyle.

महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती

0

म.रा.वि.मं. सुत्रधारी कंपनी व महावितरण कंपनीतील
कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी २०२२-२३ या शैक्षणिक
वर्षाकरिता शिष्यवृत्ती, रोख पारितोषिक, मार्च / एप्रिल
२०२२ या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत (इयत्ता १०) व उच्च माध्यमिक शालांत (इयत्ता १२ वी) परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या तसेच सलग कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात.

महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी
शिष्यवृत्ती
पात्रता:-
1) मार्च / एप्रिल २०२२ या शैक्षणिक वर्षात माध्यमिक
शालांत ( इयत्ता १० ) व उच्च माध्यमिक शालांत ( इयत्ता
१२ वी ) परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना
ऑनलाईन शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
2) माध्यमिक ( इ. १० ) व उच्च शालांत ( इ. १२ वी )
प्रमाणपत्र परीक्षा यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी
६५ टक्के व राखीव प्रवर्गासाठी कमीत कमी ६० टक्के
तसेच सलग शिष्यवृत्तीसाठी खुला वर्ग ५०% व राखीव
प्रवर्गासाठी ४५% गुण मिळवलेल्या पाल्यांना
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात.

आवश्यक कागदपत्रे:-
■ अर्जासोबत चालू वर्षाची गुणपत्रिका,
■ जात प्रमाणपत्र ( राखीव प्रवर्गासाठी).
■ जात पडताळणी प्रमाणपत्र (अनुसूचित
जमातीच्या प्रवर्गाकरीता).
■ पुढील वर्गात प्रवेश घेतल्याबाबत प्रवेश फी पावतीची किंवा बोनाफाईड प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे / ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:- ३० नोव्हेंबर २०२२
महावितरण शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महावितरणच्या खालील Employee Portal वर भेट देऊन, कर्मचाऱ्यांनी आपल्या पाल्याचे ( अर्ज ) Employee Portal अंतर्गत Application >
Ward Scholarship Application येथे क्लिक
करून शिष्यवृत्तीचा अर्ज भरावयाचा आहे. नमूद केलेली
कागदपत्रे Upload करुन पाल्यांचा अर्ज सबमिट
करावयाचा आहे.
https://empportal.mahadiscom.in/Emp
Portal
टीप:- अर्ज Save करून सबमिट न केलेल्या अर्जाचा
विचार करण्यात येणार नाही यांची कर्मचाऱ्यांनी नोंद
घ्यावी.