विद्यार्थ्यांनो पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे भरण्यात येणार
सिंधुदुर्गनगरी- लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागात कंत्राटी स्वरूपात २२ पशुधन पर्यवेक्षक पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांनी दिली.

सध्या काही ठिकाणी लम्पी आजाराने थैमान घातले असून त्यावर आळा घालण्यासाठी यंत्रणा आवश्यक आहे. शासनाकडून पदभरती होत नसल्याने तसेच अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाल्याने, त्यांची बदली झाल्याने, बढती मिळाल्याने अनेक रिक्त पदे झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक रिक्त पदे आहेत. यापैकी पशून पर्यवेक्षकांची 22 पदे भरण्यात येणार आहेत. ही भरण्यात येणारी पदे कंत्राटी असून 11 महिन्याचा कालावधी साठी भरण्यात येणार असल्याचे डॉ विद्यानंद देसाई यांनी सांगितले.