शासकीय सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करून विविध दाखले(प्रमाणपत्र) घरबसल्या मिळवा; जाणून घ्या सविस्तर माहिती
सार्वजनिक सेवा मिळविण्यासाठी लांब रांगा टाळून,
आपल्या सोयीनुसार ‘आपले सरकार’ या ऑनलाइन
पोर्टलच्या माध्यमातून विविध सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? ते सविस्तर जाणून घ्या.
आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया:- आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी “आपले
सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
हि वेबसाईट ओपन करायची आहे. आता तुमच्या पुढे आपले सरकारचे वेबसाईट ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, मराठी भाषेचा पर्याय निवडा. आता “नवीन युजर? येथे नोंदणी करा” (“New User? Register Here) या पर्यायावर क्लिक करा.
आता पुढे दोन पर्याय दिसतील त्यामध्ये इथे नवीन युजर नोंदणी करण्यासाठी पहिला पर्याय निवडा
1. आपल्या मोबाईल नंबर वर OTP द्वारे पडताळणी
करून युजर आयडी आणि पासवर्ड बनवा.
2. स्वत:ची पूर्ण माहिती तसेच फोटो, ओळखीचा
पुरावा व पत्याचा पुरावा अपलोड करून आणि
आपल्या मोबाईल नंबर वर OTP द्वारे पडताळणी
करून एकदाच स्वत:चे युजर प्रोफाईल बनवा.
भ्रमणध्वनी क्रमांक आणि युजरनेम पडताळणी:-
आता हिथे तुमचा जिल्हा निवडून मोबाईल नंबर टाका, त्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक OPT येईल तो One Time Password (OTP) बॉक्स मध्ये टाईप करा आणि युजरनेम पर्यायामध्ये युजरनेम टाका, नंतर पुढे तुम्हला पासववर्ड सेट करायला येईल तिथे पासवर्ड टाका. लॉगिन झाल्यावर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला पाहिजे त्या सेवेचा पर्याय निवडून अर्ज करायचा आहे.