रिझर्व्ह बँकेच्या ‘या’ परीक्षेचा निकाल जाहीर
भारतीय रिझर्व्ह बँकेनं सहाय्यक भरती परीक्षेचा निकाल जाहीर केलाय. या परीक्षेला बसलेले उमेदवार RBI च्या अधिकृत वेबसाइटवर rbi.org.in जाऊन आपला निकाल पाहू शकतात. RBI नं जाहीर केलेल्या या भरतीद्वारे एकूण 950 पदांची भरती केली जाणार आहे. तसंच भरती प्रक्रियेत निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना देशातील विविध शहरांमध्ये असलेल्या आरबीआयच्या शाखांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. एकूण 19 शहरांमध्ये रिक्त पदं भरण्यात आली आहेत. या परीक्षेला बसलेले उमेदवार पुढील संपूर्ण प्रक्रिया पाहण्यासाठी वेबसाइटला भेट देऊ शकतात.
RBI द्वारे सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाली. इच्छुक उमेदवारांना 8 मार्च 2022 पर्यंत अर्ज सबमिट करण्याची मुदत देण्यात आली होती.
RBI चा निकाल ‘असा’ तपासा:- निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम RBI च्या अधिकृत वेबसाइटला rbi.org.in भेट द्या. आता वेबसाइटच्या होम पेजवर उपलब्ध असलेल्या रिक्त जागा/निकालांवर जा. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असिस्टंट परीक्षा निकाल 2022 वर क्लिक करा. इथं View/Download वर क्लिक करा. आता निकालाची PDF फाईल उघडेल. उमेदवार रोल नंबर आणि नावाच्या मदतीनं निकाल तपासू शकतात.