नागपूर येथे १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत ‘अग्निवीर’ भरती
चंद्रपूर:- मागील काही वर्षांमध्ये बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिथे रोजगाराची संधी मिळेल तिथे अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ‘अग्निवीर’ अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून तब्बल ५९ हजार ९११ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यांमधील उमेदवारांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे. पुरुष उमेदवारांसाठी १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हानिहाय निवड करण्यात येणार आहे. अग्निवीर’साठी नोंदणी झालेल्या उमेदवारांची शारीरिक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रिडा संकुला मध्ये प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
या भरती मेळाव्यासाठी ऑनलाइन अर्जासह, नोंदणीसाठी लॉगइन कालावधी 3 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल. यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्रे वेबसाइटवरून 10 ऑगस्ट 2022 पासून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.
भरती मेळाव्याचा संक्षिप्त तपशील भारतीय सैन्याच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तरी, जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या आगामी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक कर्नल हिम्मत सिंह ढिल्लो यांनी केले आहे.
JEE Advanced परीक्षेच्या निकालाची तारीख घोषित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) ने JEE Advanced Result 2022 ची तारीख जाहीर केली आहे. JEE Advanced निकाल 2022 11 सप्टेंबर 2022 रोजी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर प्रसिद्ध केला जाईल. अशा परिस्थितीत, जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा दिलेले उमेदवार 2022 च्या अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वरून त्यांचे निकाल पाहू शकतात. JEE Advanced Result (JEE Advanced 2022) तपासण्यासाठी उमेदवारांना रोल नंबर, जन्मतारीख आणि फोन नंबर आवश्यक असेल.
JEE Advanced 2022 ची परीक्षा 28 ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. परीक्षेला बसलेले विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड फायनल आन्सर कीची वाट पाहत आहेत. प्राधिकरण लवकरच अंतिम उत्तर की जारी करेल अशी सूत्रांची माहिती आहे. उत्तरपत्रिकेनंतर निकाल जाहीर केला जाईल. JEE Advanced निकाल 2022 सोबत, परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑल इंडिया रँक (AIR) देखील प्रसिद्ध केले जातील.
IITB JEE Advanced परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना टेक्स्ट मेसेज देखील पाठवेल. मात्र जेईई अॅडव्हान्स परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना प्राधिकरण वैयक्तिक रँक कार्ड पाठवणार नाही. अलीकडेच तात्पुरती JEE Advanced 2022 उत्तर की अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना 3 ते 4 सप्टेंबर दरम्यान JEE Advanced 2022 च्या आन्सर की वर आक्षेप नोंदवण्याची परवानगी होती. आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्टचा JEE अॅडव्हान्स्ड निकाल 17 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल.
असं डाउनलोड करा स्कोर कार्ड:- सर्व प्रथम JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईट, jeeadv.ac.in 2022 वर जा.
त्यानंतर होम पेजवरील निकाल तपासण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करा.
आता रोल नंबर, जन्मतारीख आणि फोन नंबर टाका.
यासह, परिणाम स्क्रीनवर दिसेल.
आता JEE Advanced 2022 स्कोअरकार्ड आणि निकाल डाउनलोड करा.