ITI पास उमेदवारांसाठी या जिल्ह्यात भव्य भरती मेळाव्याचे आयोजन
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून सोमवारी (ता. १२) सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागीर घडविणारी योजना आहे. आय. टी. आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास आय. टी. आय उत्तीर्ण उमेदवारांनी उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा.
आस्थापनांनी भरती मेळाव्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in >> Apprenticeship Mela किंवा https://dgt.gov.in/appmela2022 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यशवंत कांबळे, विकास टेके आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य बी. आर. शिंपले यांनी केले आहे.