NEET UG परीक्षा दिलेल्यांसाठी अपडेट; जाणून घ्या सविस्तर माहिती
नीट यूजी (NEET UG) निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. विद्यार्थ्यांना लवकरच त्यांचा निकाल पाहता येणार आहे. नीट पुनर्परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार हा, निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
या परीक्षेला बसलेल्या आणि निकालाची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांना एनटीए नीट यूजी (NTA NEET UG) च्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. नीट यूजी परीक्षा १७ जुलै रोजी झाली होती. त्यानंतर परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षाही पूर्ण झाली आहे.
१६ लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा:- नीट यूजी परीक्षेत १८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नीट परीक्षेला १६ लाख विद्यार्थी बसले होते. नीट तात्पुरती उत्तरतालिका आधीच प्रसिद्ध झाली आहे. निकाल जाहीर होताच अंतिम उत्तरतालिका केली जाण्याची शक्यता आहे. निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
असा तपासा निकाल:- नीट यूजी परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जा. त्यानंतर होमपेजवर दिसणार्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर अशी मागितलेली माहिती भरा. निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. उमेदवार त्यांचा स्कोअर तपासून निकाल डाउनलोड करू शकतात.
नीट परीक्षेनंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश:- नीट यूजी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. एमबीबीएस, आयुष अभ्यासक्रमांव्यतिरिक्त बीडीएस आणि बीएससी नर्सिंगचे विद्यार्थी इतर वैद्यकीय अभ्यासक्रम करू शकतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे. नीट ही वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा आहे. जी राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाते. ही परीक्षा एनटीएद्वारे घेतली जाते.