महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी; जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत
या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
1.अर्जदार ही 12 वी शिकलेली असल्याचा पुरावा
2.अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत
3.घराचा 8अ उतारा
4.उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार) 5.लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा
6.बँक पासबुक ची पहिला पानाची झेरॉक्स
7.लाईट बिलची झेरॉक्स
योजनेची पात्रता:- या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना मिळेल. लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपर्यंत असणं किंवाच त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मोफत पिठाची योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.
तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवाच तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल
त्यांतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा.