Take a fresh look at your lifestyle.

महिला समृध्दी योजनेचा फायदा घेऊन वाढवा आपली आर्थिक उन्नती…

0

१ योजनेचे नाव- महिला समृध्दी योजना

२ योजने बद्दलचा शासन निर्णय

३ योजनेचा प्रकार- केंद्र शासनाच्या योजना, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना

४ योजनेचा उद्देश- अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.

५ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव- अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.

६ योजनेच्या प्रमुख अटी-
-अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
•अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
•अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
•अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
•(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
•जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
•अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
•महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

७ दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप- चर्मकार समाजातील विधवा, परित्यक्ता निराधार अशा महिला (अशा महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात येते.) तसेच सर्व महिला लाभार्थींसाठी महिला समृध्दी योजनेअंतर्गत कर्ज रक्कम रु.४००००/ व अनुदान रु.१००००/ असे दोन्ही मिळून रु.५००००/ पर्यंत ४टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येते.

९ अर्ज करण्याची पद्धत- अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ- अंदाजित

११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता- अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.