पॅरा कमांडो भरतीची प्रक्रिया कशी? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारत जगातील 4थ्या नंबरचा शक्तिशाली लष्कर असणारा देश आहे. भारतात बऱ्याच तरूणांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा असते.हे तरूण जीवाची बाजी लावून मेहनत करतात आणि सैन्यात भरती देखील होतात आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. भारतीय लष्कराच्या तुकड्यांपैकी एक म्हणजे पॅरा कमांडो यालाच भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचे स्पेशल फोर्स युनिट असेही संबोधतात. पॅरा कमांडो जवान स्पेशल ऑपरेशन्स, होस्टेज प्रॉब्लेम, डायरेक्ट अॅक्शन, अपारंपरिक हल्ले, स्पेशल मिलिटरी ट्रेनिंग, अॅन्टी टेररिस्ट ऑपरेशन्स यांसारखी अत्यंत कठीण आणि खतरनाक कामे करतात. यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या कारवाया प्राणपणाने यशस्वी पार पाडलेल्या आहेत.ज्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला गर्व आणि अभिमान आहे.
पॅरा कमांडो कसे होता येते?:- पॅरा कमांडो हे भारतातील सर्वात खतरनाक तसेच शक्तिमान लष्करी तुकड्यांपैकी एक मानले जाते. या युनिटची स्थापना 1 जुलै 1966 रोजी झाली होती. पॅरा कमांडो युनिट्स देशाला विशेषत: देशात दहशतवादी हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांपासून जीवाची बाजी लावून देशाची आणि नागरिकांची सुरक्षा करतात किंवा अशी सेवा पुरवतात. पॅरा कमांडो ही लष्कराचीच एक तुकडी आहे जी पॅराशूट घेऊन जाते. भारतीय लष्करात पॅरा कमांडोजच्या जवळपास 9 बटालियन आहेत.
पॅरा कमांडो निवड प्रक्रिया:- पॅरा कमांडो होण्याची निवड प्रक्रिया ही उमेदवारांसाठी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक प्रक्रिया असते. पॅरा रेजिमेंटमध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक सैनिकाला पॅरा कमांडो होण्याची संधी मिळत नाही. या निवड प्रक्रियेसाठी सर्व पूर्व-चाचणी भरती प्रशिक्षण अभ्यासक्रम, किंवा PRTC, ARO स्थानावरील अधिकाऱ्यांद्वारे आयोजित केले जातात.