Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना

0

माहे जून 2022 च्या  पगारातून ₹१२/- इतका कामगार कल्याण निधी कपात होणा -या कामगारांच्या कुटुंबातील  विद्यार्थ्यांना….

लाभ घेणारे:- साखर कारखाने, सुतगिरणी, लहाण मोठे कारखाने, सर्व बँका, इन्शुरन्सची कंपनी, शाॅपिंग माॅल्स, वाहतूक कंपन्या, एस.टी. महामंडळ, वीज कंपनी, वीज वितरण कंपनी, बी.एस.एन.एल., एम.टी.एन.एल. दुध संघ, कापूस पणन महासंघ, गव्हर्नमेंट प्रेस, सर्व दवाखाने, कृषि उद्योग महामंडळ, सर्व वृत्तपत्रे, कुरिअर सर्विसेस, प्राथमिक शिक्षक बँक, किंवा फॅक्ट्रि अँक्ट अंतर्गत येणार्या सर्व आस्थापना, बाँम्बे शाॅप अँक्ट अंतर्गत सर्व दुकाने, द मोटर ट्रान्सपोर्ट अँक्ट अंतर्गत नोंदित आस्थापना मध्ये काम करणार्या कामगार व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हि योजना दरवर्षी चालवते.

शिष्यवृत्ती रक्कम:-
१० वी ते १२ वी.- ₹.२०००/-
पदवी – ₹. २५००/-
पदवीत्तोर पदवी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)- ₹.३०००/-
व्यावसायिक पदविका (डिप्लोमा) – ₹ २५००/-
व्यावसायिक पदवी – ₹. ५०००/-
पी. एच. डी. नोंदणी ₹.५०००/-
mpsc prelim उत्तीर्ण ₹. ५०००/-
UPSC Preliminary उत्तीर्ण – ₹. ८०००/-
परदेशात शिकत असेल तर ₹. ५० हजार. (परदेश शिष्यवृत्तीचा स्वतंत्र online अर्ज भरावा.)

कृपया आपल्या पगारातून माहे जुन २०२२ मध्ये ₹१२/- (कामगार कल्याण निधी) कपात होत असेल तर फक्त त्यांनीच, आर एस शेख यांना फोनवर संपर्क करावा 9960761864.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कामगारा मंडळाची वेबसाइट www.public.mlwb.in