ITI पास विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका; जाहिर रोजगार मेळाव्याचा लाभ घ्या
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामनेर येथे दिनांक- 05/09/2022 रोजी सकाळी 09.30 वाजता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी खाली दिलेल्या अटींची पूर्तता करून हजर राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. एम. एस. राजपूत साहेब यांनी केले आहे.

रोजगार उपलब्ध असलेली आस्थापना :-
मारुती सुझुकी मोटर्स लिमिटेड , हंसलपुर, (गुजरात)*
प्रशिक्षणार्थ्यांने खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
1) 10 वी. मध्ये कमित कमी 40% मार्क्स घेऊन उत्तीर्ण.
2)आय टी आय मध्ये कमीत कमी 50% मार्क्स घेऊन उत्तीर्ण.
3)वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष (फक्त पुरुष उमेदवार)
4)उपलब्ध ट्रेड -फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, डीझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक व्हेहिकल, टर्नर, मशिनिष्ट, टूल अँड डाय मेकर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, ट्रॅक्टर मेकॅनिक, COE (मेकॅनिकल) आणि पेंटर जनरल
5) आय टी आय उत्तीर्ण वर्ष – 2015 ते 2022 पर्यंत असावा
6) पगार – 21000 CTC प्रति महिना 14825 इन हँड
7) उपलब्ध सुविधा- कॅन्टीन व राहण्याची सोय अल्प दरात कंपनी कडून केली जाईल.
8)निवड प्रक्रिया – लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात येईल.
9) नोकरीचे ठिकाण – हंसलपूर (गुजरात)
Apprentice झालेले मुले पण पात्र असतील
सोबत येतांना खालील कागदपत्र मूळ व छायांकित प्रतिसह हजर रहावे.
1) अद्ययावत बायो डाटा
2) 10 वी मार्कशीट
3) आय टी आय मार्कशीट व NTC सर्टिफिकेट
4) आधार कार्ड
5) पासपोर्ट फोटो.
6) अनुभव असल्यास त्याबाबतचे अनुभव सर्टिफिकेट.

लेखी परीक्षा दिनांक व ठिकाण – 05/09/2022 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर जिल्हा जळगाव
तोंडी परीक्षा दिनांक व ठिकाण – 06/09/2022 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव
मेळाव्याचे ठिकाण- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव.
संपर्क : श्री.डी.बी. टहाकळे सर – 9421680182
श्री.के.टी.धनराळे सर-9421566988
श्री.जी.एन.अहिरराव सर – 7875997751
निवड झालेल्या उमेदवारांना गुजरातला कंपनीत घेऊन जाण्यासाठी बस ची व्यवस्था कंपनी करत असते.
इच्छुक उमेदवारांनी खालील गूगल फॉर्म भरून नोंदणी करायची आहे.
https://surveyheart.com/form/6300f685ac46b266ce7c062c