Take a fresh look at your lifestyle.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना – २०२२-२३

0

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक
विद्यार्थ्यासाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना दि. २३ जुलै २००८ च्या शासन निर्णयानुसार सन २००८-०९ पासून राज्यात राबविण्यात येते.

ही शिष्यवृत्ती योजना मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौध्द व जैन या इ. १ ली ते १० वी च्या धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहे. अल्पसंख्याक समाजातील गुणवंत मुलीसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती ही योजना पूर्वी अल्पसंख्याक मुलींसाठी मोलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती म्हणून ओळखली जात होती आणि ती ०३.०५.२००३ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या परिषदेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी सुरु केली होती. सदर योजना अल्पसंख्याक (मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारसी व जैन ) समाजातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या मुलीसाठी आहे. इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी च्या मुलींना वार्षिक रुपये ५,०००/- व ११ वी व १२ वीच्या मुलीसाठी वार्षिक ६,०००/- रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.


धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल
असलेल्या विद्याथी/विद्यार्थीनींचे जास्तीत जास्त अर्ज
NSP 2.0 या पोर्टलवर भरण्याबाबत विविध माध्यामातून जाहिरात करुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच कार्यालयाच्या व शाळेच्या दर्शनी भागामध्ये योजनेच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत. प्रि – मैट्रिक शिष्यवृत्तीचे सन २०२२-२३ साठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज व बंगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना नवीन विद्यार्थीनींचे अर्ज भरावयाची प्रक्रिया केंद्रशासनाकडून NSP 2.0 या पोर्टलवर दि. २०/०७/२०२२ पासून सुरू करण्यात आलेली आहे. नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज
भरण्याची अंतिम मुदत दि. ३०/०९/२०२२ पर्यंत आहे.
सन २०२२-२३ मध्ये NSP 2.0 या पोर्टलवर नवीन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थीनांची माहिती भरण्यासाठी विद्याथी / विद्यार्थीनीचे आधार नुसार नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक व I.F.S.C कोड ( विद्यार्थ्याचे बँक खाते नसल्यास पालकांचे चालेल), कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न शाळेचे नाव व यु – डायस क्रमांक, विद्यार्थी विद्यार्थीनीचे शाळेतील जनरल रजिस्टर क्रमांक, शाळेत प्रवेश घेतलेले वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी, इयत्ता, मागील वर्षी प्राप्त झालेले गुण, पालकांचा व्यवसाय, पूर्ण पत्ता इ.
माहिती तसेच विद्यार्थी अनाथ आहे का ? अपंग आहे का ? असल्यास प्रकार व टक्केवारी इ. माहिती आवश्यक आहे. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजन॑मधील नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी आधार क्रमांक, कुटूंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न, शाळा सुरु झालेली तारीख Day Scholar / Hosteler. विद्यार्थ्याचा शाळेतील जनरल रजिस्टर क्रमांक, शाळेत प्रवेश घेतलेले वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी इत्यादी माहिती आवश्यक आहे.
कोणत्याही तांत्रिक प्रश्नांसाठी, कृपया हेल्पडेस्कवर
helpdesk@nsp.gov.in किंवा 0120-
6619540 वर संपर्क साधा (सर्व दिवशी सकाळी ८ ते
रात्री ८ पर्यंत, सुट्टीचे दिवस वगळून)