Take a fresh look at your lifestyle.

कृषी सेवा केंद्र परवाना ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

0

शेतीची मशागत करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते
म्हणजे कृषी इनपुट म्हणजे बी बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी. हे सर्व मिळण्याचे
ठिकाण म्हणजे कृषी सेवा केंद्र होय. कृषी विभागामार्फत
बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करिता परवाने प्रदान
करण्यात येतात. कृषी सेवा केंद्रामध्ये शेती संबंधित
बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना बाबींविषयी
विषयी तुम्ही विचार केला असेल.

परंतु यासाठी आपल्याला अधिकृत परवाने काढावे लागतात. ज्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र सुरु करायचे आहे, त्या ठिकाणी गावाची लोकसंख्या किती आहे? कृषी सेवा केंद्र चालेल काय? मालाची विक्री किती होऊ शकेल? आदी बाबींचा अंदाज घ्या. आपण या लेखात कृषी सेवा केंद्र परवाना (बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना) ऑनलाईन कसा काढायचा? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

कृषी सेवा केंद्र परवाना काढण्यासाठी आवश्यक
कागदपत्रेः-
■ शैक्षणिक पात्रता
■ पॅन कार्ड / आधार कार्ड / मतदान कार्ड
राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
■ राशन कार्ड झेरॉक्स
■ लाईट बिल
■ शाळा सोडल्याचा दाखला
■ ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायत
■ पत्रक ४
■ ऑनलाईन चलन फॉर्म
■ जागेचा गाव नमुना आठ
■ उगम प्रमाणपत्र / प्रिंसिपल सर्टिफिकेट
■ जागा भाड्याची असल्यास शंभर रुपयांच्या बॉण्ड
वर ऍग्रिमेंट
कृषी सेवा केंद्र परवाना ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:-
कृषी सेवा केंद्र परवाना ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात
आधी “आपले सरकारची”
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
ही वेबसाईट ओपन करायची आहे.