Take a fresh look at your lifestyle.

मुंबई महापालिकेत तब्बल 5 हजार पदांची भरती होणार

0

मुंबई महापालिकेत 2019 पासूनची नोकर भरतीवरील बंदी लवकरच उठणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबई महापालिकेत 5 हजार पदांची भरती होणार असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे.

अशी होणार होती भरती:- मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची (लिपिक) एकूण 5255 पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पध्दतीने 3221 पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली 810 पदे भरण्यात येणार आहे. महापालिकेकडून याबाबतची ऑनलाईन परीक्षा घेवून भरती प्रक्रीया राबवली जाणार होती. ही पदे भरण्यासाठी महापालिकेने कंपनीची निवड केली होती. मात्र, भरती झालेली नाही. कामगार संघटना आणि पालिका आयुक्तांची बैठक झाली. या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रशासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केले आहे. पण, नेमक्या किती जागा भरल्या जाणार याचा निर्णय पालिका आयुक्त घेणार आहेत.
गेल्या तीन वर्षांत पालिकेत भरती झालेली नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत सुमारे 30 ते 40 हजार पदे रिक्त असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत नोकर भरती थांबवण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला होता. या निर्णयाचे पडसाद याआधी मुंबई पालिकेच्या स्थायी समितीत उमटले होते.

मुंबई महापालिकेने सलग दोन वर्षे करोनाचा मुकाबला केला असला, तरीही रिक्त पदांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होताना दिसत नाही. मुंबई पालिकेत अत्याधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञान, कंत्राटी पद्धतीने उपलब्ध मनुष्यबळात नियमित कामांचा गाडा ओढला जात आहे. मात्र, पालिकेतील एकूण पदे आणि प्रत्यक्ष मनुष्यबळाची पडताळणी केल्यास रिक्त पदे अधिक आहेत. मुंबई पालिकेत एक लाख २० हजार पदे मंजूर असून, नियमित भरती आणि कंत्राटी पद्धतीने आस्थापना अनुसूचीवर प्रत्यक्ष कार्यरत पदे ९७ हजार आहेत. त्यामुळे सध्या सुमारे २३ हजार पदे रिक्त आहेत.