तलाठी भरतीचा मार्ग मोकळा; 7 जिल्ह्यात होणार भरती
मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. उर्वरित सात जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले आहे.26 जिल्ह्यातील तलाठी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतर आता 7 जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्गही शासनाने मोकळा केला आहे. मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा घेण्यात येते. यावर्षीसाठी साधारणपणे 1000 पदांपेक्षा अधिक पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण3165 रिक्त पदे भरण्यास (तलाठी भरती 2022) अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे.