Take a fresh look at your lifestyle.

रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते? जाणून घ्या मोबाईलवर

0

रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते व जर धान्य मिळत नसेल तर तक्रार कशी करायची, तर आज जवळपास सगळ्याच लोकांकडे रेशनकार्ड आहेत. त्यातील बरेच जण रेशन घेतात. पण आपल्याला किती रेशन मिळते? किंवा किती रेशन मिळायला हवे? याचा विचार कोण करत नाही दुकानदाराने आपल्याला रेशन दिले की ते आपण घरी घेऊन येतो. दुकानदार जे काही सांगेल तसे आपण करत असतो. पण हे चुकीचे आहे कारण आपल्याला माहित असायला पाहिजे कि तुम्हाला किती धान्य मिळायला हवे. हे आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकतो. आपल्याला डाळ, गहू, रॉकेल यांच्यापैकी काही गोष्टी मिळत आहेत की नाही हे आपण अधिकृत वेबसाईट वर जाऊन पाहू शकतो.

रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन कसे तपासायचे?

http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या वेबसाईटवर गेल्यानंतर ऑनलाईन सेवा हा टॅब दिसेल त्यामध्ये ऑनलाईन रास्तभाव दुकाने या पर्यायावर क्लिक करून आपण पाहू शकतात.