Take a fresh look at your lifestyle.

शाळांमध्ये शिक्षक वाढवायचा प्रश्न लागला मार्गी; राज्यात लवकरच मोठी शिक्षक भरती

0

राज्यातील तरुणांसाठी मोठी व आनंदाची बातमी आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक वाढवायचा प्रश्न मार्गी लावला. यामुळे एकूण 1293 जागांसाठी लवकरच शिक्षक भरती केल्या जाणार आहे.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील 1028 जागांची माहिती मंत्रालयात सादर करण्यात आली. तसेच उर्वरित 265 जागांची माहिती येत्या दोन दिवसांत मंत्रालयात सादर केली जाणार आहे. ही माहिती राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली. म्हणजेच एकूण 1293 जागांसाठी भरती होणार आहे.

राज्यातील महाविद्यालयांत 60 टक्क्यांहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षक भरती रखडल्याने महाविद्यालयातील शिक्षणाची परिस्थिती बिघडली आहे. या आधी भरपूर वेळेस शिक्षक भरती रखडली. परंतु, आता भरती नक्की होणार असे सांगितले जात आहे.

शिक्षक भरतीची ही माहिती राज्यातील तरुणांसाठी महत्वाची आहे. शिक्षक पदांसाठी मेगा भरती होणार आहे. एकूण 1293 जागांसाठी शिक्षक भरती होणार आहे. ही भरतीची तारीख स्पष्ट केली नाही. परंतु, शिक्षक भरती लवकरच होणार आहे.