तरुणांसाठी सुवर्णसंधी! स्वतःचा व्यवसाय थाटायचायं; तर घ्या ई-मुद्रा कर्ज योजनेचा फायदा
तुम्ही जर बेरोजगार तरुण असाल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर ‘ई-मुद्रा लोन योजना’ तुमच्यासाठी आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय टाकू शकता. या योजनेतंर्गत कर्ज घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ई-मुद्रा लोन तुम्हाला देखील मिळणार आहे. मुद्रा लोन अनेक बॅंक मार्फत दिले जाते.

ई-मुद्रा लोनद्वारे मिळवा एवढे लोन:- तुम्ही बॅंकेत जाऊन मुद्रा लोनसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून मुद्रा लोन मिळवायचे असेल, तर ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. ऑनलाईन अर्ज केल्यास तुम्हाला बॅंकेच्या नियमानुसार 50 हजार रुपये लोन मिळते. जर तुम्हाला 50 हजार रुपयांहून अधिक लोन हवं असेल, तर तुम्हाला तुमच्या बॅंक खात्याशी संपर्क साधावा लागेल.
मुद्रा लोन आवश्यक कागदपत्रे
1)बॅंक खातं
2)जो व्यवसाय किंवा उद्योग सुरू करायचा असेल त्याचा संपूर्ण तपशील असणं आवश्यक आहे.
3)बॅंक खात्याशी आधार लिंक असणं गरजेचं आहे.
जातीचे विवरण
4)तुमच्या उद्योगाचे GSTN व उद्योग आधार तुम्हाला ऑनलाईन अर्ज करतांना अपलोड करावा लागेल.
5)शॉप ॲक्ट देखील अपलोड करावे लागेल.
6)ओळख पुरावा
7)पत्त्याचा पुरावा
8)व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
9)ई-मुद्रा लोनसाठी इ. आवश्यक कागदपत्रे लागतील.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना फायदे:- मुद्रा लोन मध्ये कोणतेही शुल्क आकारल्या जात नाही.मुद्रा लोन योजना उत्पन्न निमिर्तीमध्ये गुंतलेल्या सुक्ष्म व लघू उद्योजकांना पत सुविधा देते.पत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बगर-फंड आधारित आवश्यकतासाठी असू शकतात. यामुळे तुम्ही मुद्रा लोन योजनेचा उपयोग विविध कारणांसाठी करू शकता. मुद्रा लोनची पत मुदतीची कर्जे आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी किंवा पत आणि पत हमीपत्रांसाठी अर्ज करण्याकरिता देखील वापरली जाते.
मुद्रा लोनचे तीन प्रकार
1)तरुण- मुद्रा लोन योजनेतंर्गत 5 ते 10 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.
2)किशोर- मुद्रा लोन योजनेतंर्गत 50 हजार ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.
3)शिशु- मुद्रा लोन योजनेतंर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

मुद्रा लोन योजनेचा फायदा कोणाला घेता येईल
1)लघू उद्योजक
2)फळभाज्या विक्रेता
3)दुग्ध उत्पादक
4)कुक्कुटपालन व्यावसायिक
5)मत्स्यपालन व्यावसायिक
6)शेतीविषयक उपक्रमांची संबंधित दुकानदार