Take a fresh look at your lifestyle.

परदेशामध्ये उच्च शिक्षणाचे स्वप्न होईल पूर्ण; परदेश शिष्यवृत्ती साठी समाजकल्याण विभागाकडून अर्ज करण्याचे आवाहन

0

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२२-२०२३ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२२-२३ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

योजनेच्या अटी व शर्ती

विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

●विद्यार्थी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील असावा.

●पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल.

● विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ६.०० लाखापेक्षा जास्त नसावे.

●जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या १०० विद्यापीठामध्ये व LONDON SCHOOL OF ECONOMICS मध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा लागू नाही.

‘परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल; परंतु द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पूर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती अनुज्ञेय असणार नाही. परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच MBA अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील.

●भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.

●यापूर्वी शासनाकडून परदेश शिष्यवृत्तीअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतलेला. आहे असे विद्यार्थीदेखील पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

●परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS World University Rank) ३०० च्या आत असावी. तथापि ३०० मधील The University of South Wales (UNSW Sydney), Australia हे विद्यापीठ करीत असलेल्या असहकार्यामुळे योजनेतून वगळण्यात येत आहेत. (जाहिरातीसोबतचे यादीतील) शाखेतील विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठाने शासनाने अनुज्ञेय केलेल्या अन्य शाखेअंतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला असल्यास सदर प्रवेश योजनेंतर्गत लाभासाठी ग्राह्य धरण्यात येईल.

●सदर योजनेअंतर्गत निवडीसाठी खासबाबची तरतूद नसल्याने कोणीही “प्रशासकीय/राजकीय दबावाचा वापर करू नये.

●अटी व शर्ती ह्या सविस्तर जाहिराती प्रमाणे व शासन निर्णयानुसार लागू राहतील.

● सदरील वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक :- /०६/२०२२ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे-४११००१ येथे सादर करावा.

●अर्जाचा नमुना, व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवर भेट द्यावी.

योजनेतील लाभाचे स्वरूप

●विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम तसेच केंद्र शासनाच्या नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती (National Overseas Scholarship) योजने अंतर्गत लागू करण्यात आलेली इतर फी (Other Fees) मधील (अ) आरोग्य विमा (Health Insurance) आणि (ब) व्हिसा शुल्क (Visa Fees) या बाबी परदेश शिष्यवृत्तीधारकांसाठी अनुज्ञेय असतील.विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी यू. एस. डॉलर १५,४०० तर यू.के.साठी जी.बी. पौंड ९९०० इतका अदा करण्यात येतो.

●विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेणेसाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी कमीतकमी कालावधीचा आणि नजीकच्या मार्गाचा (Shortest Route) दराचा Economy Class (इकॉनॉमी क्लासचा विमान प्रवासाचा दर दिला जाईल.

●विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यू.एस. ए. व इतर देशांसाठी यू.एस. डॉलर १५०० मर्यादित तर यू.के.साठी जी.बी. पौंड १,१०० मर्यादित इतके देण्यात येतात.यामध्ये पुस्तके, अभ्यासदौरा व इतर खर्चाचा समावेश आहे.

●अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना Post Study work Visa साठी २ वर्ष कालावधीकरिता NOC (ना-हरकत प्रमाणपत्र) अटी व शर्तीच्या अधीन राहून दिली जाईल.

● ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे एकत्रित उत्पन्न हे रु. ६.०० लाखाच्या आत असेल त्यांना सुरवातीस परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी विमान प्रवास भाड्याची रक्कम विद्यार्थ्याने मागणी केल्यास आगाऊ स्वरूपात अटी व शर्तीच्या अधीन राहून अदा केली जाईल.